कौल कुरुळीच्या जनतेचा,विजयाचा झेंडा पुन्हा मशालीचाच! कुरुळी - आळंदी ग्रामीणमध्ये विनया मुंगसे यांच्या नेतृत्वात मशालीच्या विजयाची चाहूल

 0

ZP ELECTION | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील कुरुळी येथे गावभेट दौऱ्यानिमित्त स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी कुरुळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार कु. गौरी चंदन मूऱ्हे यांच्यासह जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विनया मुंगसे उपस्थित होत्या.या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या,अपेक्षा व सूचनांचा सखोल आढावा घेण्यात आला तसेच त्यांच्या दैनंदिन प्रश्नांना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.

या संवादातून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला.जनतेचा सहभाग आणि समाधान हाच खऱ्या अर्थाने विकासाचा मजबूत पाया असतो, हे या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाले.कुरुळीकर नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.

जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या ठोस कामांच्या जोरावर यंदा कुरुळी–आळंदी ग्रामीणसह संपूर्ण जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विनया मुंगसे यांनीही नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करत विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.