राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत खेडच्या शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक

 0
राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत खेडच्या शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक

सह्याद्री LIVE | खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालय, राजगुरुनगर येथील विद्यार्थ्यांनी २०२६ या चालू वर्षात राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यमल्हार स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवले आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यमल्हार लोकनृत्य स्पर्धेत विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच,शिवराजमुद्रा करंडक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा तापडिया करंडक २०२६ मध्ये विद्यालयाने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.

राज्यस्तरीय नृत्यमल्हार स्पर्धेतच विद्यालयातील ईशांत विजय आहेर याने ओपन डान्स स्टाईलमध्ये द्वितीय क्रमांक तर परी येशुदास तलमले हिने लोकनृत्य गटात तृतीय क्रमांक मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मानद सचिव,शाळा समिती अध्यक्ष,संचालक मंडळ तसेच उपस्थित प्रांताधिकारी,तहसीलदार,गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.