खेड बाजार समितीच्या सेवकांना अनुभवानुसार पदोन्नती

 0
खेड बाजार समितीच्या सेवकांना अनुभवानुसार पदोन्नती

राजगुरुनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवक समितीची बैठक मंगळवारी (दि. ६) बाजार समितीच्या कार्यालयात झाली. या बैठकीत बाजार समितीतील सर्व सेवकांना त्यांच्या सेवाकालीन अनुभव आणि सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वर्षानुवर्षे बाजार समितीत सेवा बजावणाऱ्या सेवकांच्या कामाची दखल घेत पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आल्याने सेवक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सेवक समितीच्या अध्यक्षा, संचालिका तथा माजी उपसभापती क्रांतीताई सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी त्यांनी सेवकांना मार्गदर्शन केले. बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात सेवकांचा महत्त्वपूर्ण वाटा असून, त्यांच्या अडचणी आणि मागण्यांबाबत यापुढेही सकारात्मक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजित गाडे, माजी सभापती विजयसिंह शिंदे, संचालक जयसिंग भोगाडे, कैलास लिंभोरे, अनुराग जैद, सोमनाथ मुंगसे, हनुमंत कड, विठ्ठल वनघरे, कमलताई कड, सागर मुऱ्हे, माणिक गोरे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे, सुधीर भोमाळे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्यासह बाजार समितीचे सेवक उपस्थित होते.