शिंदेगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय टेमगिरे यांची बिनविरोध निवड
चाकण : शिंदे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी खेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मेजर दत्तात्रय रामभाऊ टेमगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी चेअरमन तथा संचालक चंद्रभागा पाचपुते, गोरक्षनाथ पाचपुते, रामदास पाचपुते, बबुशा घनवट, आनंदा माताळे, बबन पाचपुते, मारुती मेंगळे आणि हिराबाई जांभळे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय टेमगिरे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील,सभापती अशोक राक्षे, अमोल पाचपुते पाटील,सुनील देवकर,सुनील घनवट,शिवाजी माताळे,सुखदेव जांभळे,नवनाथ देवकर,विजय घनवट,तानाजी टेमगिरे,निलेश पानमंद,संकेत घनवट,तानाजी पानमंद,अमोल झिंजूरके,तुषार टेमगिरे,राजेंद्र टेमगिरे,सुरेश टेमगिरे आणि अनिकेत पानमंद यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.