जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी पत्रकार विजय मुर्हे यांची बिनविरोध निवड

 0
जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी पत्रकार विजय मुर्हे यांची बिनविरोध निवड
जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी पत्रकार विजय मुर्हे यांची बिनविरोध निवड

चाकण ( पुणे ) : औद्योगिक क्षेत्रातील कुरुळी ( ता.खेड ) येथील नामवंत श्री जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेची २०२५ - ३० ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.यामध्ये पत्रकार विजय विष्णू मुर्हे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्री जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक सुरेश रामाणे,हिरामण आल्हाट,संतोष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.यामध्ये पत्रकार विजय मुर्हे,प्रकाश आल्हाट,दत्तात्रय मोकाशी,प्रविण कुदळे,शंकर आल्हाट, प्रीतम आल्हाट,विकास सासवडे, संतोष पवार,नीलम रामाणे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.