दिलीप मोहिते पाटील यांच्या विचारांच्या प्रतिनिधींचा आलेख वाढता;देवोशी सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी

 0
दिलीप मोहिते पाटील यांच्या विचारांच्या प्रतिनिधींचा आलेख वाढता;देवोशी सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी

राजगुरूनगर : गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर खेड तालुक्यातील देवोशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सोसायटीतून साहेबराव बबन आंद्रे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली.

या निवडीमुळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विचारांच्या प्रतिनिधींची संख्या वाढत असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू आहे.

साहेबराव आंद्रे यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती अंकुश राक्षे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, शंकर राक्षे यांच्यासह सोसायटीचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

देवोशी येथील या निवडीकडे आगामी सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात असून, मोहिते पाटील समर्थक गटाचे सहकार क्षेत्रातील वाढते प्रतिनिधित्व चर्चेचा विषय ठरत आहे.