चाकण येथे १ नोव्हेंबरला माळी समाजातील विवाहेच्छुकांचा मेळावा
इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन
चाकण | पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण येथे माळी समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना विवाहासाठी योग्य जोडीदार निवडता यावा, तसेच समाजातील कुटुंबांना एकमेकांशी परिचय साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने श्री संत सावता माळी वधू-वर सूचक मंडळ यांच्या वतीने चाकण येथे रविवारी (दि. १) भव्य राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत या मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांना आपला परिचय, तसेच पालकांना आपल्या मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राजेंद्र घुमटकर,तुकाराम कांडगे,शोभा शेवकरी, मीना गोरे,गोरक्षनाथ कांडगे,ज्योती वाघ आदींनी या मेळाव्याचे आयोजन व नियोजन केले आहे.