आंबेठाण सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण बुट्टेपाटील

 0
आंबेठाण सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण बुट्टेपाटील

सह्याद्री लाईव्ह | आंबेठाण,वराळे,बोरदरा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी वराळे ( ता.खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रामभाऊ बुट्टेपाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते चेअरमन मिथुन बाबुराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

 राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी लक्ष्मण बुट्टेपाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. वराळे, आंबेठाण आणि बोरदरा अशी तीन गावांमिळून ही विकास सोसायटी आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी.सी.संकपाल यांनी काम पाहिले. त्यांना सोसायटी सचिव सर्जेराव काळे यांनी मदत केली.

याप्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मण रामभाऊ बुट्टेपाटील,व्हाईस चेअरमन गणेश एकनाथ आंद्रे,संतोष बाबासाहेब मांडेकर,दीपक विष्णू मांडेकर, मावळते चेअरमन मिथुन बाबूराव चव्हाण,धोंडिभाऊ मारुती पडवळ,मोहन महादू पडवळ,दत्तात्रय मारुती चव्हाण,बबन नानाभाऊ घाटे उपस्थित होते.

निवडीनंतर आमदार बाबाजी काळे,बाजार समिती सभापती अशोक राक्षे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील,आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर,पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील,भालेराव कड पाटील आदींनी नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मण बुट्टेपाटील यांचे अभिनंदन केले.