खेड तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतचे सरपंचपद आरक्षण सोडत तारीख जाहीर

राजगुरूनगर ( खेड ) : न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिनांक ०५/०३/२०२० च्या अधिसुचनेव्दारा निश्चित केलेले सरपंचपदाचे आरक्षण अधिसुचनेच्या उर्वरित कालावधीतील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी फेरआरक्षण निश्चित करणे आवश्यक असलेने दिनांक ०१/०१/२०२४ ते ०४/०३/२०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत निश्चित करणेत आले आहे.
पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते दिनांक ०४ मार्च २०२५ या कालावधीतील ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरीकांचा मागास प्रवर्ग,महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) जिल्हास्तरावर सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत काढणेत येणार आहे.
मा.निवासी उपजिल्हाधिकारी,पुणे जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली वार गुरुवार दिनांक २७/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकणी खेड तालुक्यातील दिनांक ०१/०१/२०२४ ते दिनांक ०४/०३/२०२५ या कालावधीत मुदतसंपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती १) खराबवाडी २) जउळके खुर्द ३) कोहींडे ब्रु ४) सोळू ५) वडगाव घेनंद ६) धामणे ७) गुळाणी ८) रौंधळवाडी ९) आसखेड बु १०) आंबेठाण ११) वाशेरे १२) सायगाव १३) कडाचीवाडी १४) बोरदरा १५) पाईट १६) कोये १७) खालुंब्रे १८) टेकवडी या खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.
वरील आरक्षण सोडतीकामी खेड तालुक्यातील सर्व आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, ग्रामस्थ यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.