पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड; माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा रामराम

 0
पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड; माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा रामराम

पुणे : राज्यात अनेक पक्षांचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत शिंदे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

 पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर ही पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहे.काँग्रेस पक्षाचे पुणे शहरातील एकमेव शिलेदार असलेले धंगेकर पक्ष सोडणार असल्याने काँग्रेस पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

 पक्षाला अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे रवींद्र धंगेकरांनी सांगितले आहे.कॉग्रेस सोडताना दुःख होत आहे.योग्य वेळ आल्यावर सर्व बोलणार आहे.मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे. मी कोणतीही अपेक्षा बाळगून पक्ष प्रवेश करत नाही. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.