राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाकण ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सर्व रोग तपासणी शिबिर तसेच रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी चाकण शहराध्यक्ष राम गोरे,तालुका महिला अध्यक्ष संध्याताई जाधव,बाजार समिती संचालिका नंदाताई कड,माजी नगरसेवक विशाल नाईकवाडी,उद्योजक साहेबराव कड,उद्योजक किशोर जगनाडे,दत्ताभाऊ चौधरी,अल्पसंख्याक अध्यक्ष मुबीनभाई काझी,उद्योजक गुलाबशेठ शेवकरी,अमोल घोगरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र,दन्त,रक्तदाब,शुगर,स्त्रीरोग,कर्करोग,ईसीजी,एक्सरे आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या.याचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष राम गोरे यांनी सांगितले.