चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गोरे यांची दमदार राजकीय खेळी; अनेकांची माघारी; शिवसेना उमेदवारांना जाहीर पाठिंबा
चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आजी - माजी पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) पुन्हा एकदा आपली घोडदौड कायम असल्याचे दाखवून दिले आहे.स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून,यामागे शिवसेना शिंदे गटाचे दमदार नेते नितीन गोरे यांचे दमदार राजकीय खेळी असल्याची चर्चा सध्या खेड तालुक्यात रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण कौटकर आणि सोनल कौटकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन आपल्या हक्काच्या प्रभाग क्रमांक ०३ मध्ये स्वतः थांबण्याचा निर्णय घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत सुवर्णा शाम राक्षे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.
योगिता योगेश आढारी यांनी ही प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्वतः थांबण्याचा निर्णय घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत अनिल इंदाराम लोहकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये महेश आनंदराव शेवकरी, ऋतुजा विशाल शेवकरी,धनंजय शेवकरी, सारिका धनंजय शेवकरी यांनी आपली उमेदवारी माघारी घेत शिवसेनेते उमेदवार पूनम सुनिल शेवकरी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधील ऋषीकेश गोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेत शिवसेना उमेदवार रणजीत जरे यांना पाठिंबा दिला आहे.
प्रभाग क्रमांक एक मधील महिला उमेदवार राजश्री राम गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन उमेदवार जयश्री विशाल नायकवाडी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शहरातील या राजकीय घडामोडी मुळे चाकणच्या राजकारणात नवीन समीकरणांची निर्मिती होत असून,पालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक विकासकामांमध्ये गती,कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि संघटन बळकटीकरणाच्या धोरणावर नितीन गोरे यांनी विशेष भर दिल्याचे बोलले जात आहे.
प्रवेशदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “चाकणच्या बदलासाठी आम्ही शिवसेना शिंदे गटाला मजबुती देणार,” असा निर्धार नव्या प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.
या घडामोडींमुळे शिवसेना (शिंदे गट) च्या पाडद्या मागील हालचालींनाही वेग आला असून, निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत. चाकणमधील राजकारणात नितीन गोरे यांच्या या दमदार राजकीय खेळीने आगामी दिवसांत आणखी काही मोठ्या हालचाली पाहायला मिळू शकतात, अशी कुजबुज चाकणच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.