- वारं फिरलं, जनतेचं ठरलं. - वाफगाव रेटवडी जि. प. गटात अजित पवारांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळालाच मतदान करण्याचा जनतेचा निर्धार
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाफगाव–रेटवडी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक आता भावनिक होऊन मतदारांनी आपला कौल स्पष्ट करत ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हालाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यात तथा सर्व मतदार संघात दुःखाची लाट जनतेत पाहायला मिळत आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांनाधीच दादांचं निधन झाल्याने अनेकांना कामाचा माणूस गामावल्याचे दुःख आहे. दादांनी दिलेले उमेदवार ही त्यांच्यासारखेच कामाचे आहेत हे जनता जाणुन आहे. म्हणुन दादांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी दिलेल्या उमेदवारांना मतदान करून निवडुन देण्याचा निर्धार जनतेने केला आहे.
गेल्या अनेक वर्षांत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या भागात रस्ते, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच शेतीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पाणी प्रश्न, ग्रामीण भागातील दळणवळण आणि विकासकामांना त्यांनी दिलेले प्राधान्य आजही जनतेच्या लक्षात आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, अजित पवारांच्या कार्याची आणि नेतृत्वाची पावती ठरत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
गावोगावी होणाऱ्या बैठका, मतदारांशी थेट संवाद आणि प्रचारादरम्यान महिला, युवक, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र आहे.
"बारामती ला जाऊन दादांना थेट श्रद्धांजली देता आली नाही, म्हणुन आम्ही सर्व त्यांच्या घड्याळाला मतदान करून दादांना आदरांजली वाहणार आहोत" अशी स्पष्ट भूमिका मतदार घेत असून, विकासासाठी घड्याळालाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.
मतदार संघात इतर प्रतिस्पर्धी उमेदवार मतदान मिळवण्यासाठी पाण्यासारखे पैसे वाटप करत आहेत. त्यावर जनतेला त्यांचं मत विचारलं असता जनतेने स्पष्ट शब्दात 'कोणी कितीही पैसे वाटु द्या, आम्ही अजित दादांचं घड्याळ सोडुन कोणालाही मतदान करणार नाही' अशी भूमिका मांडली.
काही जणांनी पैसे घेण्यास थेट नकार दर्शविला आहे. आम्हाला पैसे नको, आमचे सोन्यासारखे दादा आम्हाला महत्वाचे आहेत.आम्ही घड्याळालाच मतदान करणार हे स्पष्ट केलं.
एकूणच, “वारं फिरलं, जनतेचं ठरलं” अशी स्थिती वाफगाव–रेटवडी जिल्हा परिषद गटात निर्माण झाली असून, इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांना हे जड जाणार आहे अशी जोरदार चर्चा सध्या मतदार संघात आहे. आगामी निवडणुकीत ‘घड्याळा’ला मोठा कौल मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.तसेच सर्वच मतदार संघांत हे चित्र पहावयास मिळत आहे.