कुरुळी - आळंदी जिल्हा परिषद गटात महिला सक्षमीकरण आणि गावविकासावर भर - विनया मुंगसे
ZP ELECTION | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील चऱ्होली आणि केळगाव येथे विनया मुंगसे यांनी प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात महिला सक्षमीकरण, स्थानिक प्रश्न आणि सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
केळगाव येथे गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून विनया मुंगसे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.या भेटीत नागरिकांच्या समस्या,अडचणी व स्थानिक प्रश्न सविस्तरपणे जाणून घेतले.गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांसाठी सातत्याने कार्य करत असून, त्यांच्या विश्वासातूनच पुढील काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात केळगावसह संपूर्ण कुरुळी–आळंदी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच नागरिकांनी यापुढेही आपला आशीर्वाद व भक्कम पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली.
चऱ्होली गावातील तनिष सृष्टी सोसायटी येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभाला उपस्थित राहून विनया मुंगसे यांनी माता-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.या समारंभात महिलांमधील आत्मविश्वास,आपुलकी आणि एकजूट प्रकर्षाने दिसून आली. कुटुंब व समाजाचा कणा असलेल्या महिलांचा विकासाच्या मुख्य प्रवाहात सक्रीय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून,त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सक्षम करणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिलांकडून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद आणि आशीर्वाद मोलाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार काळूरामजी थोरवे हे देखील उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.