चाकण येथे १८व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन; चाकणचे ८७ विद्यार्थी सहभागी

 0
चाकण येथे १८व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन; चाकणचे ८७ विद्यार्थी सहभागी
चाकण येथे १८व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन; चाकणचे ८७ विद्यार्थी सहभागी

चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी,सारा अबॅकस अकॅडमी यांच्या अंतर्गत इंटरनॅशनल अबॅकस मॅथेमॅटिक्स असोसिएशन भारत व नॅशनल कोर कमिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी सुंदर हस्ताक्षर,वैदिक गणित,चित्रकला,रोबोटिक्स,फोनिक्स,अबॅकस,रुबिक क्यूब या विविध विषयांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते.

वैदिक गणित कोर्समध्ये ४ मिनिटांमध्ये क्लिष्ट, अवघड उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडवायची असतात. चित्रकलेमध्ये एक तासाचा वेळामध्ये चित्र काढायचे असते. फोनिक्स कोर्समध्ये मुलांचं वाचन आणि लेखन घेतले जाते. सुंदर हस्ताक्षर कोर्समध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाचे सुंदर हस्ताक्षराची स्पर्धा घेतली जाते.रोबोटिक्स कोर्स माध्यमातून विविध प्रकारचे प्रकल्प बनविण्याचे स्पर्धा घेतली जाते. एका मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याची स्पर्धा घेतली जाते.३ मिनिटांनी ५ मिनिटांमध्ये अबॅकसची १०० कठीण उदाहरणं सोडवण्याची स्पर्धा घेतली जाते. या विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन नियोजन आणि सराव चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी येथे घेतला जातो,चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील सर्व गावातील शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.

यावर्षी चाकण येथे ८७ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेचा पुणे विभागीय पहिला राऊंड १८ जानेवारी २०२६ रोजी चाकण येथे संपन्न होणार आहे. ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यातून विभागानुसार घेतली जाते. पुणे विभागातील सात जिल्ह्यातील १२० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. विभागीय पहिल्या राऊंडमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा दुसरा आणि फायनल राऊंड ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. या विद्यार्थ्यांचा सराव अकॅडमीच्या शिक्षिका स्वाती ढबाले,संध्या जाधव,कविता बोडके,रुपाली पाटील, पल्लवी पवार आणि प्राचार्या डॉ. अर्चना प्रवीण आघाव यांनी घेतला आहे अशी माहिती अकॅडमीचे डायरेक्टर डॉ.प्रवीण आघाव यांनी दिली आहे.