कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात विनया सुधीर मुंगसे यांची प्रचारात आघाडी;मतदारांचा कौल विनयाताईची मशाल विजय स्पष्ट
ZP Election | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उमेदवार विनयाताई सुधीर मुंगसे यांच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला असून मतदारांचा कौल स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गावोगावी सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,मतदार मोठ्या मनाने आशीर्वाद देत भरघोस पाठिंबा दर्शवत आहेत.
गावभेटी,पदयात्रा,बैठका आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून विनयाताई मुंगसे यांनी विकासाचा ठोस व वास्तववादी आराखडा मतदारांसमोर मांडला आहे.महिलावर्ग,युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होत असून, “काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी” देण्याची ठाम भूमिका मतदार व्यक्त करत आहेत.
या प्रचारामागे सुधीरभाऊ मुंगसे यांचे गेल्या पाच वर्षांतील अखंड न थकणारे आणि जनतेशी थेट जोडलेले कार्य निर्णायक ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.महाविकास आघाडीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे.खेड तालुक्यातील पाणीपुरवठा,रस्ते,वीज,आरोग्य शिबिरे, अपघातग्रस्त कुटुंबांना मदत,गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार,रोजगारासाठी मार्गदर्शन तसेच शिक्षण संस्थांमधून सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
गेली पाच वर्षे एकही दिवस न थांबता जनतेच्या सुख-दुःखात कुटुंबातील सदस्याप्रमाणे सहभागी राहिल्यामुळे आज मतदारांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल ठाम विश्वास निर्माण झाला आहे. सध्या प्रचार यंत्रणेत दिसणारी ताकद, आत्मविश्वास आणि वाढता जनसमर्थन यामागे सुधीरभाऊ मुंगसे यांचे भक्कम सामाजिक कार्य असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून विनयाताई सुधीर मुंगसे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘मशाल’ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली असून, ही निवडणूक आता केवळ लढत न राहता प्रतिष्ठेची व निर्णायक ठरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.सध्याच्या परिस्थितीत मतदारांचा कल एकतर्फी दिसत असून निकालाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.