रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
चाकण ( पुणे ) चाकण (ता. खेड) येथील नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै.भागुबाई पिंगळे कला वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय आणि लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर,मोरया ब्लड सेंटर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कै.भागुबाई पिंगळे कला वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.३१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असुन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले पाहिजे हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्राचार्य बुट्टे सर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन डी पिंगळे संस्थेचे संचालक डॉ.संदेश टिळेकर,संस्था सचिव डॉ. शितल टिळेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष नितिन मुंगसे, सचिव गुलाब डोखे,अमर गावडे,शितल गावडे कार्यक्रमास उपस्थित होते.