अजितदादांच्या आठवणीने विनयाताई गहिवरल्या; उलगडला दादांचा पारिवारिक प्रवास

 0
अजितदादांच्या आठवणीने विनयाताई गहिवरल्या; उलगडला दादांचा पारिवारिक प्रवास

सह्याद्री LIVE | विनयाताई गहिवरल्या….उलगडले दादाचा परिवारीकचा प्रवास….तसं राजकारणाचा बाळकडू मला माहेरपासून आहे,आमचे आजोबा हभप विठोबा लांडे पाटील आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो,तेव्हापासून मोठे साहेब,प्रतिभा काकी, सुप्रियाताई यांचं घरी येणे - जाण असायचं आम्ही परिवार म्हणून त्यांचा कंटूबिक कार्यक्रमात भाऊ सोबत आम्ही बारामतीला जात,कालांतराने अजित दादाची राजकारणात आले व खासदार झाले, आम्ही ३ ही भावंड शालेय जीवनात होतो,वडील नगरसेवक,आमदार झाले.अजितदादा व सुनेत्राताई, प्रतिभा काकी यांचा सोबत कंटूबिक नातं अजून घट्ट झाल,माझी मम्मी नगरसेवक,महापौर झाली,तिचा सोबत कार्यक्रमला जाण्या येण्यामूळ दादांशी ओळख वाढली,त्यानी कधी नावानी नाही पण प्रेमाने !! बेटया !! कशी आहे l,अस अवाज मारायचे पाय पडायला गेलो तर डोक्यात मारायचे,पाय पडून कधी दिल नाही,अरे तू माझा मूली समान आहेस, एकदा कार्यक्रम उरकून ते जेवायला आले. त्यावेळेस,मला अणि उपस्थित पाहुण्याना बोलले, विलासराव माणूस पारख करणयात हुशार आहे, जावई कसा देखाना खमक्या अणि रूबाबदार निवडला,आम्ही त्यावेळेस त्याला हसून दाद दिली, नुकत्याच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकी वेळेस सुनेत्राताई व दादा हे भोसरीच्या घरी येऊन जेवण करून गेले, माझा भाऊ निवडून आल्यावर एक कौटुंबिक भेट म्हणून दादाला भेटण्यसाठी, विक्रांत,विराज अणि मिस्टर हे दादाना भेटले. त्यावेळस नुकतीच जिल्हा परिषद निवडूण कार्यक्रम जाहीर झाला होता,मिस्टर सुधीरजीसोबत तालुक्याबद्दल चर्चा केली,सुधीरजी तुमच्या तालूक्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे,मी महिती घेतोय,माझं बारीक लक्ष आहे व काही वडीलकीचा सल्ला दिला व माझी मुलगी जिल्हा परिषदेत सभागृहात दिसली पहिजे,असा दमच हसत हसत त्यांनी माझे भाऊ व मिस्टराना दिला, हा एक राजकीय समीकरण पलीकडचा कंटूबिक जिव्हाळा आमचा अणि त्यांचा होता, दादांच्या जाण्याने आमच्या मुंगसे व लांडे परिवाराची वैयक्तिक हानी झाली ती भरूण निघणार नाही पण महाराष्ट्रानी विकासाचा !! बाप माणूस !!गमवला दादा तुम्हाला या बेट्याकडून अखेरचा दंडवत…