स्व.गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण स्वागत
चाकण (पुणे) : ज्ञानवर्धिनी विद्यालय,भामा इंग्लिश मिडीयम स्कुल आणि स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण येथे शैक्षणिक वर्षे २०२५-२६ च्या विद्यार्थी यांचे स्वागत अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले.
मुलांबरोबर पालक आणि शिक्षक यांचेही स्वागत संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे,संचालक ओंकार गोरे, ज्ञानवर्धिनी विद्यालय मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, स्व.आ. सुरेशभाऊ गोरे ज्युनियर कॉलेज प्राचार्य सचिन आभाळे,भामा स्कुल प्रिन्सिपल माधुरी गोरे, पर्यवेक्षक सविता कुमकर,ज्योती अनाप,विभाग प्रमुख दत्तात्रय लिंभोरे,शिक्षक सुवर्णा चौधरी, स्वाती काळे,रुपाली भालेराव,सिद्धार्थ मळेवाडी, नंदा जैद,संजना विश्वासराव,अर्चना माळी,आरती काबदे,उर्मिला कोबल,सुनील वडेकर,गणेश काळे, सुनील कोटलवार आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
मुलांना गुलाबपुष्प,पेन्सिल,पेन,पेढे आणि फ़ुगे देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील विविध उपक्रम,नावीन्य पूर्ण,गुणवंत्ता पूर्वक शिक्षणाबरोबर,संस्कारक्षम नागरिक घडण्यासाठी अध्यात्मिक,वैज्ञानिक,सांघिक कौशल्य,उत्तम खेळाडू विविध क्षेत्रात मुलांच्या माध्यमातून शाळेचा नाव लवकिक वाढविण्यासाठी आदर्श व गुणवंत शिक्षक कार्य करीत आहे.सर्व शिक्षक यांचे ही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.