कुरुळी येथे सचिनजी अहिर यांची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा

 0
कुरुळी येथे सचिनजी अहिर यांची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा
कुरुळी येथे सचिनजी अहिर यांची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा

ZP ELECTION | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुरुळी येथे शिवसेना उबाठाची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेत कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार विनया मुंगसे, कुरुळी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार कु. गौरीताई चंदन मुऱ्हे तसेच आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार काळुराम थोरवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना आमदार सचिन अहिर साहेब,खेड–आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे, उद्योजक सुधीर मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. 

सभेत मार्गदर्शन करताना आमदार सचिन अहिर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत असून, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत तळागाळातील लोकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवावेत, असे आवाहन केले.

आमदार बाबाजी काळे येत्या निवडणुकीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितींवर शिवसेनेचा भगवा फडकणार,असा ठाम विश्वास व्यक्त केला. उमेदवार विनया मुंगसे यांनीही जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेला चंदनदादा मुऱ्हे,पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.