खेड तालुक्यात वूई टुगेदर फाउंडेशनवतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 0
खेड तालुक्यात वूई टुगेदर फाउंडेशनवतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
खेड तालुक्यात वूई टुगेदर फाउंडेशनवतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजगुरुनगर ( पुणे ) : शाळा दुर्गम भागातील पट संख्या कमी,सुविधांची कायमच कमी,दळणवळण जिकरीचे अश्या अनेक समस्यांना तोंड देत आदर्श हुशार विध्यार्थी घडविणे हे शिक्षकांना एक आवाहनच असते.हे आवाहन स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी खेड तालुक्यातील हेंद्रुज,बच्चेवाडी शाळेचा पदभार स्वीकारला.या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ,संगीत,क्रीडा,आदी बाबतीत अत्यन्त हुशार,बनून एक आदर्श निर्माण केला.त्यांनी स्वतः खर्च करून सुरवात केली व गावातील लोकसहभागातून संगणक,लाऊड स्पीकर,लॅपटेब,स्टेशनरी,लोखंडी कपाट, स्टडी टेबल,वाल कंपाउंड,रंगकाम,ग्राऊंड दुरुस्थी, खेळाचे साहित्य,प्रिंटर ,झेराक्स आदी साहित्य लोकसभागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला.

या सर्व कार्याची दखल घेऊन व पुढेही त्यांनी असेच कार्य सुरु ठेवावे म्हणून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बहिरू बच्चे यांच्या हस्ते व मान्यवर आणि ग्रामस्थांच्या विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संजय गोरख होले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी फाउंडेशन सचिव,मंगला डोळे - सपकाळे,सेक्रेटरी,जयंत कुलकर्णी,अध्यक्ष सलीम सय्यद,सदस्य,श्रीरंग दाते,श्रीनिवास जोशी,खुशाल दुसाने,विलास गटने,समीर बच्चे,उपसरपंच,गोरक्ष बच्चे,सुशांत वाडेकर,रवींद्र बच्चे,मच्छिन्द्र बच्चे,विशाल बच्चे,रोडीराम बच्चे,संदीप बच्चे,सारीका बच्चे आदींसह शाळा समिती,ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांना एनर्जी ड्रिंक,खाऊ वाटप करण्यात आला.