चाकणमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिवस’ साजरा

 0
चाकणमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिवस’ साजरा

सह्याद्री LIVE | भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त (दि.११ फेब्रुवारी)भारतीय जनता पार्टी चाकण कार्यालयात ‘समर्पण दिवस’ साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी भाजपा खेड तालुका अध्यक्ष भगवान मेदनकर,जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार,चाकण मंडल सरचिटणीस अजय जगनाडे,संदेश जाधव, चाकण मंडल उपाध्यक्ष बाळासाहेब भोपे,सहकार आघाडी खेड तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे,युवा मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष धिरज वाळुंज, युवा मोर्चा सरचिटणीस नसीम पठाण,वाहतूक आघाडी चाकण मंडल अध्यक्ष योगेश देशमुख,अल्पसंख्यांक मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष शार्दुल पठाण,दत्ता परदेशी,दक्षिण भारतीय आघाडी चाकण मंडल अध्यक्ष गणपती गौडा पाटील,वाहतूक आघाडी उपाध्यक्ष संतोष ओतारी,समीर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंघासाठी स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे राजकीय विचारांचे अधिष्ठान होते,तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संघटनात्मक आणि वैचारिक स्तरावर पक्षाची भक्कम मांडणी केली. त्यांनी मांडलेली अखंड मानवतावादाची विचारसरणी आणि अंत्योदयाची संकल्पना आजही भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीचा आधार मानली जाते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा विचार त्यांनी मांडला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. वक्त्यांनी त्यांच्या साध्या जीवनशैलीचा, संघटन कौशल्याचा आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. ‘समर्पण दिवस’ निमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवा, संघटन बळकटीकरण आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.