चाकण येथील आघाव दांपत्याला राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार प्रदान

 0
चाकण येथील आघाव दांपत्याला राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार प्रदान

चाकण : शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चाकण (ता.खेड )येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालय - गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण आघाव आणि प्राचार्या डॉ. अर्चना प्रविण आघाव या उभयतांना २०२५ चा राष्ट्रीय भारत भूषण हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,साई इंडिया ट्रस्ट दिल्लीचे अध्यक्ष डॉ.शंकर अंदणी,पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक पुनम सुरेश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. 

 ज्ञानम् - परम् - ध्येयम् आणि आरोग्य - संस्कार - शिक्षण या त्रीसूत्रीच्या आधारे चाकण येथे २०१२ पासून संतोष ऑल राऊंडर अकॅडमी,सारा अबॅकस अकॅडमी आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालय - गुरुकुलच्या माध्यमातून डॉ. आघाक दांपत्य अध्यापनाची कार्य यशस्वीपणे करत आहेत.आजवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि परीक्षेचे यशस्वी आयोजन,प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा आधुनिक पद्धतीने वापर केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.