देहूत श्री संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त लाखों भाविकांचे दर्शन

 0
देहूत श्री संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त लाखों भाविकांचे दर्शन

तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥१॥

धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ॥२॥

जळी दगडासहित वह्या । तारीयेल्या जैशा लाह्या ॥३॥

म्हणे रामेश्वरभट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा ॥४

देहू : येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त देहूत लाखो भाविकांचे उपस्थित संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा झाला.इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळया निमित्त कीर्तन,प्रवचन,गाथा भजन,गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले.मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा - माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला.

संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळा याची देही याची डोळा भाविकांनी पाहिला. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर,संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.देहू नगरपंचायतीने पिण्याचे पाणी,आरोग्य सेवा, स्वच्छता प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. देहूत सीसीटीव्हि यंत्रणा तसेच पब्लिक ऍड्रेस सिस्टएम प्रभावी पणे विकसित केली असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता मुख्याधिकारी निवेदिता घार्गे,नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी घेतली.देहू परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते.मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी पोलीस आयुक्तालयाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.