महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद

चाकण ( पुणे ) : जेवणानंतर घराजवळ शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीवरून पोबारा करण्यात आलेल्या एका चोरट्यासह दोन विधीसंघर्षीत बालकांना महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.
औद्योगिक वसाहतमधील वासुली (ता.खेड ) येथील अर्चना दीपक लिंभोरे या (दि.२ ) ला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून घराजवळ शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरून नेले.त्याच दिवशी लागोपाठ ३ चैन स्नॅचिगच्या घटना समोर आल्या होत्या.
या घटनाच्या अनुषंगाने या वासुली ते कामशेत असे ४५ किमी अंतराच्या अंतर्गत रस्त्यावरील सिसिटीव्ही फुटेज तपासून मोटार सायकलवरील तीन जणांच्या संशयास्पद हालचाली यांची माहिती घेऊन एका संशयितसह दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तपास केला असता त्यांनी चोरीची कबुली दिली.यांच्याकडून चोरी केलेले ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचे ५ तोळे,८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १०० टक्के ऐवज व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे.मोटार सायकलही चाकण येथून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाई महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे,पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार,तानाजी गाडे,विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे,किशोर सांगळे,संतोष काळे,अमोल निघोट,गणेश गायकवाड,शिवाजी लोखंडे,संतोष वायकर,राजेंद्र खेडकर,अमोल माटे,मंगेश कदम, राजेश गिरी यांनी केली.