कंपनी सुपरवायझरने केली दोन लाख रुपयांची पचिंग शीटची चोरी

 0
कंपनी सुपरवायझरने केली दोन लाख रुपयांची पचिंग शीटची चोरी

चाकण (पुणे) : कंपनीतील दोन लाख रुपये किमतीचे एमएसएचआर पचिंग शीटची चोरी करणाऱ्या प्रॉडक्शन सुपरवायझरचा अटक करण्यात आली आहे.सदर घटना आंबेठाण गावच्या हद्दीतील एका कंपनीत (दि.२२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

विठ्ठल सिध्दप्पा जकाते (वय.३७ वर्षे,नोकरी, रा. चाकण,ता खेड,जि पुणे) यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रॉडक्शन सुपरवायझर संजय श्यामलाल विश्वकर्मा ( वय.३२ वर्षे,मूळ रा.प‌द्मी पो.चिन्हाई, ता.रामनगर,जि.सतना,मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावच्या हद्दीतील टेक्नोक्राफट इंजिनिअरिंग कंपनीतील संजय विश्वकर्मा हा प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून नोकरी करत आहे.त्याने आपल्या फायद्यासाठी कंपनीतील १ लाख ८२ हजार ८०० रुपये किंमतीचे १२० एम.एस.एच.आर पंचीगचे शीट चोरी करतना आढळून आला आहे.यापूर्वी ही संजय याने १००० किलो वजनाचे अंदाजे ६० एम.एस.एच.आर पंचीगचे शीटचा अपहार केला आहे.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.