घरफोडीतील १८ लाखांचे सोन्याचे दागिने पीडित कुटुंबाला सुपूर्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची दमदार कारवाई

चाकण ( पुणे ) : अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटातुन २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कुरुळी ( ता.खेड ) येथे उघडकीस आली होती.महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तत्परतेने तपास करीत चोरट्यास ताब्यात घेऊन त्याने बिहार राज्याच्या नेपाळ देशाच्या सीमेवरील सोनाराकडून हस्तगत केलेले सोन्याचे दागिने परत देण्यासाठी मा.न्यायालयाकडे जलदगतीने अहवाल सादर करुन तसा आदेश प्राप्त करून सोन्याचे दागिने पीडित कुटुंबाला परत देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अरविंद प्रकाश कसाळे (रा.कुरुळी, ता.खेड ) यांनी (दि. २०/०९/२०२४ ) रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी
सीसीटीव्हीचे अवलोकन करत तपास करीत असताना संशयीत व्यक्तीची शरीरयष्टी व त्याचे चालण्याची लकब याचा अभ्यास करुन तपास पथकाने (दि.१४/०१/२५) मोशी (ता.हवेली ) स्पाईन रोड परिसरात वरील संशयीत व्यक्ती प्रमाणे दिसणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता,त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले दागिने ( मुळ गाव मौजे ढाका,जि मोतीहारी,बिहार )येथे विकले असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बिहार येथील नेपाळ सिमेवरील दुर्गम ठिकाणी जावुन दागिने खरेदी करणारे व्यक्तीस ताब्यात घेवुन दोन्ही आरोपींकडे तपास करुन चोरलेले १८ लाख रुपये किंमतीचे २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा १०० टक्के ऐवज हस्तगत करत पीडित कुटुंबाला परत देण्यात आला आहे.पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,पोलीस उप-आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते,तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या पथकाचे पीडित कुटुंबाने आभार मानले आहे.