भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

 0
भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

चाकण (पुणे) : चाकण - आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी चौक,वाय जक्शन येथे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एकास टँकरची दुचाकीस पाठीमागून धडक बसल्याने त्यात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 राघु ज्ञानोबा कड (वय.५७ वर्षे,रा.संतोषनगर,भाम,ता.खेड)असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

सचिन अरुण कड (वय.३५वर्ष,रा.संतोषनगर, भाम ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राघू कड हे (दि.१२) च्या सुमारास सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक,एम.एम.१४/एचए ५९३७) वरून सुदवडी (ता.मावळ)येथे कामानिमित्त जात असताना.चाकण - आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी (ता.खेड ) येथील वाय जक्शन येथून जात होते.त्याचवेळी पाठीमागून

पाण्याचा टॅक्टर नंबर (एमएच.१२,एचडी १३६४) वरील अज्ञात चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत टँकर चालकाने भरधाव वेगाने चालवत दुचाकीस जोराची ठोस दिली.धडक बसल्याने राघू कड हे रस्त्यावर खाली पडून टँकरचे पुढील चाकाखाली आल्याने त्यांच्या पोटास तसेच डोक्यास,हातपायास गंभीर दुखापत होऊन त्यात राघू कड यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.