जेसीबी आर्थिक फसवणूक प्रकरण; हगवणे कुटुंबातील दोन जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडून अटक

 0
जेसीबी आर्थिक फसवणूक प्रकरण; हगवणे कुटुंबातील दोन जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडून अटक

चाकण (पुणे) : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.यामुळे हगवणे कुटुंबीयांचे पाय आणखी खोलात गेल्याचे समोर आले आहे.

प्रशांत येळवंडे (रा.निघोजे,ता.खेड ) यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.आज (दि.३) महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना ताब्यात घेऊन खेड न्यायालयात हजर केले.न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची (दि.६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रशांत येळवंडे आणि शशांक हगवणे यांच्यात २५ लाख रुपये किमतीच्या जेसीबी खरेदीसंदर्भात व्यवहार ठरला होता.त्यानुसार,प्रशांत यांनी सुरुवातीला शशांक हगवणेला ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. पुढील अटीप्रमाणे जेसीबीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचे हप्ते प्रशांत हे दरमहा ५० हजार रुपये शशांक हगवणेला देत होते.हा व्यवहार एक विश्वासावर आधारित असतानाही,शशांकने हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला.

दरम्यान,शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला,मात्र,प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते,त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही.या व्यवहारातून प्रशांत यांना एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

* जेसीबीचा व्यवहार हा फक्त भाडे तत्वावर झाला असल्याचा युक्तिवाद खेड न्यायालयात हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला.त्यामुळे ही आर्थिक फसवणूक म्हणता येणार नाही.असे ते म्हणाले.यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मे (२०२४)ला जेसीबी खरेदीचा आर्थिक व्यवहार झाल्या असल्याचे शशांक हगवणेने दिलेला जबाब पोलिसांनी न्यायालयात सादर केला.