कुरुळी गावठाण ते कडवस्ती रस्त्याची चाळण; बांधकाम विभागाला पत्र देऊन दखल घेईनात

 0
कुरुळी गावठाण ते कडवस्ती रस्त्याची चाळण; बांधकाम विभागाला पत्र देऊन दखल घेईनात

चाकण ( पुणे ) : कुरुळी (ता.खेड) येथील कुरुळी गावठाण ते चाकण एमआयडीसी कडवस्ती रस्त्याची चाळण त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कुरुळी गावठाण ते कडवस्ती रस्त्याची चाळण सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपचातीने अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा अधिकारी लक्ष देत नाही, त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 पुणे नाशिक महामार्ग ते कडवस्ती एमआयडीसी रस्ता सुमारे दोन किमी अंतर असून सकाळी आणि सायंकाळी पुणे नाशिक मार्गावरती होणारी वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात कामगारांच्या बसेस मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहतूक करत असतात.

या रस्त्यावर असणाऱ्या इंग्लिश मीडियम स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना संघर्ष करत शाळेपर्यंत पोहोचावे लागते या मार्गावरती  दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या साईट पट्ट्या खचल्या असून पायी चालणे अवघड झाले आहे.ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर रस्त्यावर येते.

* कुरुळी गावठाण ते चाकण एमआयडीसी कडवस्ती रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर आनंद इंग्लिश मीडियम स्कूल समोर रस्त्यावर पाणी येथे त्यामुळे खड्डे पडले असून या काम बाबत ग्रामपंचायत सरपंच यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे परंतु अधिकारी लक्ष देत नाहीत. - कविता कोतवाल, ग्रामपंचायत अधिकारी. 

* कुरुळी ते कडवस्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या साईट पट्ट्या,गटार,खड्डे याबाबत कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात यावी यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पत्र देण्यात आले आहे. - रमेश बागडे,माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी कुरुळी.