महानगाव निघोजे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 0
महानगाव निघोजे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चाकण ( पुणे ) : महानगाव निघोजे( ता खेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या एक हजार विद्यार्थ्यांना शाळेत दप्तर  2X2 लॉजिस्टिक्स बाय महिंद्रा लॉजिस्टिक्सकडून वाटप करण्यात आले. 

 याप्रसंगी कंपनी अधिकारी नरेश गोयत,श्रीधर गायकवाड,राकेश पांडे,अभिजित कदम,दिपक सिंग,दिनेश गुप्ता,सौरव राणा,गौरव सिंग तसेच सरपंच सुनीता येळवंडे,माजी उपसरपंच संतोष येळवंडे,माजी उपसरपंच सागर येळवंडे,समाधान येळवंडे,सामाजिक कार्यकर्ते काळुराम येळवंडे,शाळा समिती अध्यक्ष सुनील येळवंडे,सोमनाथ बेंडाले,कैलास येळवंडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चाकण एमआयडीसी परिसरातील निघोजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुणे जिल्हा परिषदेच्या मान्यतेने प्रथमच ९ वी आणि १० वी वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.कंपन्या सीएसआरमधून आणि दानशूर ग्रामस्थ यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत म्हणून शालेय साहित्य शाळेसाठी व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुराव करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असल्याचे सरपंच सुनीता येळवंडे यांनी सांगितले.