स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने जयंती महोत्सवाचे आयोजन

 0
स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने जयंती महोत्सवाचे आयोजन
स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने जयंती महोत्सवाचे आयोजन

राजगुरुनगर ( पुणे ) : स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा पुणे जिल्ह्याच्या वतीने ३ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे हे असणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदेशीर सल्लागार एड. साधना बाजारे, शिवव्याख्याते सागर वाघमारे हे प्रमुख वक्ते असणार आहेत.

 खेड तालुक्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

 या कार्यक्रमाचे नियोजन विकास शिंदे,विनोद हिवराळे,सोनू काळे,सोमनाथ लोंढे,हरीश कांबळे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

स्थळ - नीलकमल लॉन्स,चांडोली टोल नाक्याजवळ,ता.खेड,जि.पुणे.