मुसळधार पावसात माऊलींच्या रथाची सराव चाचणी; पावसात रथ ओढण्याचा भाविकांमध्ये उत्साह

 0
मुसळधार पावसात माऊलींच्या रथाची सराव चाचणी; पावसात रथ ओढण्याचा भाविकांमध्ये उत्साह

आळंदी ( पुणे ) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळा १९ जूनला पार पडणार आहे.या निमित्ताने लाखो भाविकांचे अलंकापुरीत आगमन होत असते.या प्रस्थान सोहळ्यास अवघा पाऊण महिना बाकी आहे.या आषाढीवारीच्या अनुषंगाने माऊलींच्या रथाची भर पावसात सराव चाचणी केली जात आहे.

शहरात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी या पावसात माऊलींच्या रथाची काही ठिकाणी टॅक्टरने तर काही ठिकाणी माणसाने रथ ओढत सराव चाचणी घेण्यात आली.या रथाची भक्त निवास ते साई मंगल कार्यालय,साई मंगल कार्यालय ते भक्त निवास अशी सराव चाचणी टॅक्टर जोडून तर कुठे ग्रामस्थ कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.पावसात ही रथ ओढण्याचा उत्साह ग्रामस्थ कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत होता.