स्मार्ट व्हिलेज सावरदरीचे सरपंच संदिप पवार यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार
चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज सावरदरी गावातील विविध विकास कामे आणि डिजिटल सावरदरी उपक्रमाच्या माध्यमातून नव्याने ओळख निर्माण करून देणारे सरपंच संदीप पवार यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन तथा आयुक्त चंद्रकांत दळवी,इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,जलतज्ञ अनिल पाटील,जल अभ्यासक सतीश खाडे, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद संस्थापक जयंतराव पाटील यांच्या हस्ते स्मार्ट व्हिलेज सावरदरी नगरीचे विद्यमान सरपंच संदिप बाळासाहेब पवार यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देण्यात आला.