आयटीआय राजगुरुनगर येथे कारगिल विजय दिन साजरा

 0
आयटीआय राजगुरुनगर येथे कारगिल विजय दिन साजरा
आयटीआय राजगुरुनगर येथे कारगिल विजय दिन साजरा

राजगुरुनगर ( पुणे ) : कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने योद्धा माजी सैनिक संघटन राजगुरुनगर आणि शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजगुरुनगर यांच्या समन्वयाने कारगिल विजय दिवस संपन्न झाला. 

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांच्या समवेत खरेदी विक्री संघ खेड तालुका 

उपाध्यक्ष माजी सैनिक दत्तात्रय रामभाऊ टेमगिरे, सचिव माजी सैनिक सयाजी शितोळे,माजी सैनिक प्रशांत राक्षे,माजी सैनिक ऋषिकेश आरुडे,काश्मीर येथे ऑन ड्युटी असणारे सैनिक विनायक म्हसे उपस्थित होते.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व सैनिकांना कार्यक्रमाला उपस्थित वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचं कायम स्मरण देश वासियांना स्मरणात राहावे. म्हणून कारगिल विजय दिवस सोहळा आयोजन संस्थेकडून करण्यात आले.

या देशभक्तीपर कार्यक्रमाला शिक्षक प्राचार्य यू के सूर्यवंशी,शिल्प निदेशक संतोष बिन्नर,शिल्प निदेशक अमोल जाधव,शिल्प निदेशक श्रेणिक शिरसाठ,शिल्प निदेशक एस व्हि दरेकर,शिल्प निदेशक सी एस साळुंखे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम - स्वस्तिक वहाळ ,द्वितीय - उमेश पांढरपोटे वकृत्व स्पर्धा प्रथम - विशाल लोणकर ,द्वितीय- तेजस गफले या विजेत्या विद्यार्थ्यांचा माजी सैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.