पर्यावरण वाचवा संदेश देत भाजप चाकण मंडलचे वृक्षारोपण

 0
पर्यावरण वाचवा संदेश देत भाजप चाकण मंडलचे वृक्षारोपण

चाकण ( पुणे ) प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण वाचवा हा अनोखा संदेश देत भारतीय जनता पक्षाचे चाकण (ता.खेड ) मंडलच्या वतीने चाकण येथे शंभर देशी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच वृक्षांचे पालन पोषण करण्याची शपथ घेण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद,जिल्हा यूवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव,जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर,माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी,मनोज मांजरे,चाकण मंडलचे अध्यक्ष भगवान मेदनकर,संदेश जाधव,प्रवीण करपे,दिलीप वाळके,अमोघ धाडगे,अर्जुन बोराडे,निलेश गोतरणे,सूर्यकांत बारणे,बाळासाहेब भोपे,किशोर अहिरे,नसीम पठाण,प्रशांत शेवकरी,रावसाहेब ढेरेंगे आदींसह भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.