"आर्यनची कमाल अज्याची धमाल" खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्या्थ्यांचे नाटक नाट्यस्पर्धेत

 0
"आर्यनची कमाल अज्याची धमाल" खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्या्थ्यांचे नाटक नाट्यस्पर्धेत

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद येथील विद्यार्थ्यांनी पुणे येथे जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये आर्यनची कमाल अज्याची धमाल हे नाटक उत्कृष्ठ सादर करून परीक्षकांनी मने जिंकली.

  डोंगरी भागातील अज्याची कहाणी आणि हुशार आर्यनसह खोडकर मुलांची कहाणी पाहून प्रेक्षक आणि परीक्षकांनी मुलांची कौतुक केले. 

या नाटकाचे लेखन दिग्दर्शन नारायण करपे यांनी केले. तर नाटकाचे नेपथ्य तानाजी म्हाळुंगकर यांनी तर रंगभूषा ,वेशभूषा, प्रकाश योजना संदीप कचाटे यांनी केले. 

नाटकामध्ये मंगेश शिंदे,सार्थक शिर्के,स्वराज शिंदे, स्वप्निल शिंदे,तन्मय कावडे,विघ्नेश चिखले,समृद्धी शिंदे,आरोही शिंदे,आणि आरोही शिर्के या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय केला.

नाटकातील मुलांचे कौतुक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे,गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्ताराधिकारी राजेश जंगले,केंद्रप्रमुख मुख्याध्यापक प्रमोद पारधी,गडद गावचे सरपंच चंद्रकांत शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे,माजी अध्यक्ष तुकाराम शिंदे आणि ग्रामस्थांनी केले.