सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढलेले परिपत्रक रद्द करण्यासाठी आंदोलन

 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढलेले परिपत्रक रद्द करण्यासाठी आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात (दि.२४ ) तीव्र आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा एकदा विरोध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अर्जुन चपराणा,राष्ट्रीय सचिव अक्षय क्रांतीवीर भाऊसाहेब अजबे ,अभिजीत गोरे,मंगेश दुतोंडे, अविनाश साळुंखे,शुभम तांबे,सिद्धांत जांभुळकर,हुजेबा शेख,सागरजी सोनकांबळे, निखील सिद्धीगणेश आदींसह विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभगाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

 विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांनी एक परिपत्रक (३० डिसेंबर २४ ) प्रसिद्ध केले आहे.या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर,अहिल्यानगर उपकेंद्र व नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही स्वरुपाच्या सभा,बैठका, आंदोलने व तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.असे आदेश काढण्यात आले आहे.जर विद्यार्थी संघटना कर्मचारी संघटना व प्राध्यापक संघटनांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश काढण्यात आले आहेत.या आदेशाच्या विरोधात 

विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांच्या आणि कर्मचारी प्राध्यापकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे पत्र आहे.यामुळे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेससह विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

* राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आम्ही सातत्याने या काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहोत. आज दुसऱ्यांदा आम आम्ही आंदोलन केले आहे. आमची सुरवातीपासून मागणी आहे की , विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये. जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही. तोपर्यंत आम्ही एकत्रितपणे आंदोलन मोर्चे करत राहणार आहोत. 

- अक्षय कांबळे ( राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस )