श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल

 0
श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल

आळंदी ( पुणे ) : महाराष्ट्र राज्य कलासंचलनालय यांच्या वतीने माहे सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरीइंटरमिजीएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची विद्यालयाचा १००% निकाल लागला असून विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. 

विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेस ७८ व इंटरमिजिएट परीक्षेस ९६ असे एकूण १७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एलिमेंट्री परीक्षेत ए ग्रेडमध्ये अनिशा शिंदे,भक्ती वाघमारे,फर्जना शेख, गायत्री लोहोर,कार्तिकी डिघुळे व श्रुती गोरे हे ६ विद्यार्थी पास झाले असून बी ग्रेडमध्ये २६ तर सी ग्रेडमध्ये ४६ विद्यार्थी पास झाले. 

तसेच इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेडमध्ये विवेक गुट्टे, आदित्य कंकाळे,अनुश्री जाधव,भक्ती फड, गीतांजली पाटील,साक्षी शिरसकर,सुजित जोरी व ऋतुजा जगताप हे ८ विद्यार्थी पास झाले,असून बी ग्रेडमध्ये २५ तर सी ग्रेडमध्ये ६३ विद्यार्थी पास झाले.या विद्यार्थ्यांना कला अध्यापक दत्तात्रय वंजारी व सोमनाथ बेळळे यांनी मार्गदर्शन केले. 

 या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.