चाकण विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड

 0
चाकण विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.मावळत्या चेअरमन राजश्री राम गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

​राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. बगाटे यांनी काम पाहिले, तर सोसायटीचे सचिव अरुण धाडगे यांनी त्यांना सहाय्य केले.

​याप्रसंगी मावळत्या चेअरमन राजश्री गोरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र खेडकर,जगदीश मेदनकर,बाबाजी राक्षे,अशोक परदेशी,अशोक कड,बाळासाहेब पठारे,शोभा कड,अशोक गोरे,अभिषेक मुटके आणि धीरज आगरकर यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​निवडीनंतर बोलताना "आपल्या कार्यकाळात शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन," असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय गोरे यांनी व्यक्त केला.