'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व' खेड तालुक्यात यशस्वी संपन्न;नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात

अनेक अर्जांवर जागेवरच सुनावणी; आमदार बाबाजी काळे यांच्या पुढाकार

 0
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व' खेड तालुक्यात यशस्वी संपन्न;नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात

खेड (पुणे) : शासनाच्या विविध योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकाच छताखाली पोहोचाव्यात, या उद्देशाने खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार मा. श्री. बाबाजी रामचंद्र काळे यांच्या पुढाकाराने चांडोली (ता. खेड) येथील शालीमार पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

​मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

* ​प्रश्नांचे जागेवरच निराकरण -

शिबिरादरम्यान नागरिकांचे महसूल, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, फेरफार, सातबारा, वारस नोंद, निवास, पुरवठा, शिक्षण, वन, कृषी तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अर्जांवर मार्गदर्शन करून तातडीने कार्यवाही करण्यात आली. उर्वरित प्रकरणांवर प्राधान्याने मार्ग काढण्यासाठी ती संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आली.

* ​कार्यालयांचे हेलपाटे वाचणार - आमदार बाबाजी काळे

यावेळी उपस्थितांशी थेट संवाद साधताना आमदार बाबाजी काळे म्हणाले, "सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या समस्यांचे एकाच ठिकाणी जलद निराकरण व्हावे, या हेतूने हे शिबिर आयोजित केले आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

* ​प्रशासन अन् लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती -

या शिबिरास उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत,जि. प. सदस्य विजयसिंह शिंदे पाटील,तनुजा घनवट, विनया मुंगसे,गणेश आरगडे,दिप्ती भोगाडे, गणेश बोत्रे,समीर सुपे यांच्यासह नायब तहसीलदार मनीषा खैरे,रविंद्र मोरे,राम बीजे,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे,वन अधिकारी संतोष कंक,पुरवठा अधिकारी महादेव कुंभार,गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले आदी अधिकारी उपस्थित होते.

​तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजीत गाडे, पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेत पाणंद रस्ते सहअध्यक्ष शांताराम भोसले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे व तुषार वाटेकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आमदार बाबाजी काळे यांनी आभार मानले.