स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा प्रथम वर्धापन दिन व संयुक्त जयंती महोत्सव साजरा

 0
स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा प्रथम वर्धापन दिन व संयुक्त जयंती महोत्सव साजरा

राजगुरुनगर ( पुणे ) : स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा प्रथम वर्धापन दिन संयुक्त जयंती महोत्सव संविधान सन्मान परिषद आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कवी संमेलन शिरोली (ता.खेड ) येथे मोठ्या थाटामाटा संपन्न झाला.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज केलेले सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे होते.प्रमूख वक्ते शिवव्याख्याते संपतराव गारगोटे,व्हाईस प्रिन्सिपल से विलफ्रेंड्स लॉ कॉलेज आणि शितल यशोधरा सचिव

डॉक्टर मारूफ बशीर,पोलीस पाटील संघटनेचे बाळासाहेब शिंदे पाटील,राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे एड.सुनील बांगर,चैतन्य संस्थेच्या सुरेखाताई श्रोत्रीय,राजजी गुजर प्रतिष्ठानचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष रज्जाकभाई शेख,कवी,लेखक,दिग्दर्शक हृदयमानव अशोक,शिरोली गावच्या आदर्श पोलीस पाटील निर्मलाताई देखणे,बाळासाहेब सांडभोर, यशदाचे प्रशिक्षक वामन बाजारे,सपना राठोड. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे ऍड.रुपेशा हरणशिकारे, सुनिता शिवशरण,दिलीप पालवे, विनोद हिवराळे,नितीन गायकवाड,तुषार गायकवाड,निलेश ठाकूर,विकास शिंदे,सोनू काळे, सारिका खरात,स्नेहल सुतार,हरीश कांबळे, सोमनाथ लोंढे, सुरेखा पालवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधानाविषयी आणि संविधानातील मूलभूत तत्त्वांविषयी अगदी साध्या आणि सरळ भाषेत सर्वसामान्य जनतेला समजेल असे विचार उपस्थित मान्यवरांनी मांडले.स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अगदी व्यवस्थित केल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वाघमारे व सोनाली सुतार यांनी केले.