चाकणला शिवसेना उमेदवारांसाठी खासदार आमदार निवडणूक मैदानात;चाकण नगरपरिषद निवडणूक
सह्याद्री DIGITAL NEWS - नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ मावळ लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार श्रीरंगआप्पा बारणे, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे प्रचार मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्यात येणार होती,मात्र पुढील सभेला उशीर होत असल्याने मोबाईलवरून सभेला संबोधित करताना सांगितले की,स्व. आ.सुरेशभाऊ गोरे यांनी केलेलं खेड तालुक्यातील विकासकामांची आठवण करून देत,त्यांच्या विचाराच्या माध्यमातून चाकण नगरपरिषदेला निधीची कामतरता पडू देणार नाही. मनिषाताई सुरेशभाऊ गोरे ही माझी लाडकी बहीण उमेदवार आहे त्याच बरोबर शिवसेनेचे सर्व उमेदवार यांना धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन केले.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनिषाताई गोरे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,चाकण शहरातील सर्वांगीण विकासासाठी कचरा निर्मूलन, स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा, सुसज्ज रस्ते, स्ट्रीट लाईट, महिलासाठी सुलभ शौचालय, cctv कॅमेरा, डिजिटल शालेय सुविधा, भाजीपाला मार्केट जागा, सुसज्ज पार्किंग सुविधा नागरिक यांना करून देणार असून ट्रॅफिक कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून पुणे नाशिक महामार्ग व चाकण तळेगाव शिक्रापूर महामार्ग काम लवकरात लवकर पूर्ण वाहतूक कोंडी समस्या सोडवणार आहे.सर्व मतदार बंधू भगिनी यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटण दाबून सर्व उमेदवार यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विकास रेपाळे,कामगारनेते उपसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद,सभापती विजय शिंदे, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर,निलेश पवार,ज्योतीताई अरगडे, काळुराम कड,मारुती सातकर,प्रविण गोरे,निलेश गोरे,विशाल नायकवाडी,गुलाब शेवकरी,धनंजय पठारे,विशाल पोतले,सचिन वाघमारे,मंगलताई गोरे, अशोक बारवकर,नितीन गायकवाड,बिपीन रासकर,रोनक गोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.