वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेटचा जल्लोष;आदिराज ग्रुपचे राजेंद्रजी गोरे यांचा जन्मदिन साजरा

 0
वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेटचा जल्लोष;आदिराज ग्रुपचे राजेंद्रजी गोरे यांचा जन्मदिन साजरा

सामाजिक | आदिराज ग्रुपचे डायरेक्टर तसेच चाकण नगर परिषदेचे माजी प्रथम उपनगराध्यक्ष राजेंद्रजी गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिराज ग्रुपच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चांदूस-कोरेगाव येथील योगेश धायबर क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत कंपनीतील स्टाफ, फिल्ड टीम व सुपरवायझर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडा विरंगुळा मिळावा आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही एकदिवसीय स्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला.

बक्षीस वितरण समारंभात बोलताना राजेंद्रजी गोरे म्हणाले, “आदिराज कंपनीतील प्रत्येक कर्मचारी हा केवळ कामगार नसून तो आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी पुढील काळात अधिक सकारात्मक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक चषक, ट्रॉफी व पदकांनी गौरविण्यात आले. बक्षिसे स्वीकारताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. स्पर्धेचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी वसंत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे आदिराज ग्रुपमध्ये आनंद, उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून, वाढदिवसानिमित्त केलेला हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.