पहेलगाम येथे झालेल्या भ्याड जातीवादी हल्ल्याचा चाकणला निषेध; मृत हिंदू बांधवांच्या आत्म्यांना श्रद्धांजली

 0
पहेलगाम येथे झालेल्या भ्याड जातीवादी हल्ल्याचा चाकणला निषेध; मृत हिंदू बांधवांच्या आत्म्यांना श्रद्धांजली
पहेलगाम येथे झालेल्या भ्याड जातीवादी हल्ल्याचा चाकणला निषेध; मृत हिंदू बांधवांच्या आत्म्यांना श्रद्धांजली

चाकण ( पुणे ) : मानवतेला काळींबा फासणारी घटना जम्मू - काश्मीर येथील पहलगाम येथे घडली. धर्मांध जातीवादी आतंकवाद्यांनी हिंदू बांधवाना धर्माच्या नावाखाली गोळ्या घालून ठार करण्यात आले,अशा जातीवादी पाकधार्जिण्या आतंकवाद्यांचा जाहिर निषेध करण्यासाठी आणि मृत पावलेल्या हिंदू बांधवाना श्रद्धांजली वाहण्यासाठी (दि.२३ ) रोजी भारतीय जनता पार्टी चाकण (ता.खेड ) मंडलच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शिवाजी खराबी,अमृत शेवकरी,भगवान मेदनकर,मनोज देशमुख,शाम पुसदकर,विष्णू घुमरे,अनिल सोनवणे,शाम खेडकर,संदेश जाधव, अजय भुजबळ,रंजन परदेशी,अजय जगनाडे, प्रितम शिंदे,श्रीकांत परदेशी,ओंकार जाधव, शुभम राऊत,प्रशांत शेवकरी,धीरज वाळुंज,यश मेदनकर,कौस्तुभ चौधरी,बिरू भिसे,योगेश देशमुख,अरूण जोरी,कृष्णा परदेशी,पवन परदेशी,दिग्विजय परदेशी,रमेश राजपूत,शुभम देशमुख,व्यंकटेश इंगळे,मयुर जाधव,स्वप्नील जाधव,संतोष परदेशी,जयदेवसिंग दुधाणी,गणेश उंबरे,संदीप कासार,निरंजन भुजबळ,दर्शन मेदनकर,चेतन राऊत,दत्ता शेवकरी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पहलगाम येथील दहशतवादी हल्ला अत्यंत निषेधार्ह आणि दुःखद आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमी लवकर ठीक व्हावेत ही प्रार्थना करतो. हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे.असे विचार भाजपचे सहकार आघाडी तालुका अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी व्यक्त केले. 

सरकारकडून सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत करण्यात येईलच परंतु या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत.कारण हा देशाच्या एकतेवर हल्ला असून सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांच्या पलीकडे जात या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे,असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी यांनी केले.