गॅस सिलेंडरमधून बेकायदा गॅस फिरलिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 0
गॅस सिलेंडरमधून बेकायदा गॅस फिरलिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

चाकण ( पुणे ) : ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करत असताना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरमधून गॅस रिफिलिंग करताना आढळून आल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना १२ जुलै सांयकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हरेराम विदेशपाल पाल (वय.३१,रा.भोसलेवस्ती, महाळुंगे,ता.खेड,जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हरेराम पाल हा जयगणेश गॅस रिपेअरिंग सेंटर या टपरीवर बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे उघडकीस आले.ही प्रक्रिया कोणतीही सुरक्षितता न पाळता सुरू होती.यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता.

पोलिसांनी घटनास्थळावरून १४ हजार ३०० रुपये किमतीच्या ८ गॅस सिलेंडर टाक्या, वजनकाटा व गॅस काढण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.