धाडसी कारवाई! जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चार जणांना बेड्या
क्राईम | जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई मंगळवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरूळी येथे करण्यात आली आहे.
राजिक मेहबुब शेख (वय.२९, रा. वेताळनगर, चिंचवड), सुरज नरेश कदम (वय.३२, रा. मातोश्री कॉलनी, डांगे चौक), आसिफ उस्मान तांबोळी (वय.२८,रा. बोपोडी, पुणे) व गोविंद बाबुराव कांबळे (वय.२९, रा. न-हेगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश नामदेव गायकवाड यांनी बुधवारी (दि.१८ मार्च) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी आपसांत संगनमत करून खेड तालुक्यातील कुरूळी येथे तीन पत्तीवर पैसे लावून जुगार खेळत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य असा एकूण ७४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.