चाकण शहरात वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात
क्राईम | चाकण शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मच्छीमार्केटसमोरील गल्लीत राजगुरूनगरच्या एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ही घटना शनिवारी (दि. १४) रोजी दुपारी घडली.किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक समोर आली आहे.
प्रथमेश माने (रा. राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.या घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.संबंधित युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसून,या घटनेचा चाकण उत्तर पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.
गेल्याच्या आठवड्यात बिरदवडी (ता.खेड ) येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याचा प्रकार ही उघडकीस आणला होता.