हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर;चालकाने काय रचला प्लॅन

 0
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर;चालकाने काय रचला प्लॅन
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर;चालकाने काय रचला प्लॅन

पुणे : हिंजवडीमध्ये बुधवारी(दि.१९) ला कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. 

* धक्कादायक माहिती

हिंजवडीमधील ही घटना अपघात नसल्याचे माहिती समोर आली आहे.ही आग अपघाताने नव्हे,तर चालकाकडून हेतु परस्सर लावण्यात आली आहे.या घटनेत स्वत: चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला.फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.

* चालकानं असे कृत्य का केले...?

चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता.त्यामुळेच चालकानं,सूडबुद्धीने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब  पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेत शंकर शिंदे,गुरुदास लोखरे,सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला आहे.