दारू माफियावर कारवाई!अवैध विक्रीप्रकरणी एक जण जेरबंद
क्राईम | बेकायदेशीररीत्या दारू विक्री करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आंबेठाण चौक, चाकण येथे मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कृष्ण बहादूर सिंग (वय.२७, रा. आंबेठाण, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई निखिल बाळासाहेब वर्पे (वय.३३) यांनी बुधवारी (दि.१८) उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे सात वाजताच्या सुमारास चाकणमधील आंबेठाण चौक येथे असलेल्या साई हॉटेल अॅण्ड चायनीस सेंटरमध्ये आरोपीकडे १७ हजार ५०० रुपयांची देशी-विदेशी दारू साठवून विक्री केली जात होती. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.